
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
जालना : राज्याबाहेर गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांशी अजूनही परत येण्यासाठी शिवसेनेकडून संपर्क सुरू आहे. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्याशी माझे बोलणे झाल्याची महीती शिवसेनेचे ) माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलीय. येत्या 28 तारखेला जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हा शिवसेनेची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते बोलत होते.अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे माझ्या संपर्कात असल्याचंही खोतकर यांनी म्हटले आहे. राज्याबाहेर गेलेले आमदार पुन्हा परत येतील असा विश्वास देखील खोतकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, मि फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहे या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर खोतकर यांनी राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार सत्तेत कायम राहील असे म्हटले आहे.
अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे माझ्या संपर्कात – अर्जुन खोतकरदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे राजकारणाचा हा लढा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल असताना या घडामोडीमध्ये एक नवीन बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन वेळा फोन करून त्यांच्याशी या सर्व घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर, त्यांनी राज यांच्या तब्येतीची सुद्धा विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे.