
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:-भूम-परंडा-वाशी आ.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे गोलाई चौक येथे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यतील राजकीय परिस्थिती पाहता म.वि.आ.मध्ये सतत दूजाभाव मिळत आल्यामुळे, योग्य न्याय मिळत नसल्यामुळे शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट निर्माण झाला. या गटाला जाहीर असा पाठींबा आ.तानाजी सावंत यांनी दिली. भुम- परांडा वाशी येथे त्यांचे असंख्य समर्थक आहेत. शिवसेनेचे आ.तानाजी सावंत यांना एकीकडे विरोध आहे तर दुसरीकडे भूम येथे त्यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.शिवसैनिकांनी आ. तानाजी सवांत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मोठे शक्तिप्रदर्शन केले.भूम शहरात मोठी रॅली काढून घोषणा देण्यात आल्या. त्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत असे स्थानिक राष्ट्रवादी त्रास देत असल्याच्या व्यथा शिवसैनिकांनी व समर्थकांनी मांडल्या. आ. सावंत जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तुम्ही बांधलं ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण,आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असा हुंकार देत होते.यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आ.सावंत यांनी घेतलेला निर्णय योग्य असून जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी यांचे स्वकीयसह विरोधात असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने कसे खच्चीकरण केले याचा पाढा शिवसैनिकांनी वाचून दाखवला. डॉ.तानाजी सावंत भूम ,परंडा, वाशी, उस्मानाबाद ,यवतमाळ मतदारसंघात कोट्यावधी रुपये खर्च करून शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारणाची कामे केली. सामूहिक विवाह सोहळे, कोविड सेंटर, आत्महत्या केल्याचे शेतकरी कुटुंबांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक शैक्षणिक मदत करीत अनेक मुलांना शिक्षण व नोकरीत संधी दिली. यासह अनेक विकास कामे स्वखर्चाने समाजिक मदत करण्याच्या भूमिकेतून केली हे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,भूम चे गटनेते संजय नाना गाढवे,शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा माजी सभापती दत्ता साळुंखे,परंडा तालुका प्रमुख अण्णा जाधव, युवा सेनेचे तालुका प्रमुख माजी उपसभापती बालाजी गुंजाळ,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख युवा सेनेचे निलेश चव्हाण, प्रसिध्दी प्रमूख संग्राम लोखंडे, मा. नगरसेवक नागनाथ नाईकवाडी, युवराज हुंबे, शिवाजी भडके,विशाल ढगे, राकेश जाधव,बापू गुंजाळ, हर्षल डीसले, दत्ता नलवडे,अतुल सपकाळ, सूरज गाढवे, समाधान सातव ,दत्ता काळे असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.