
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अरुण भोई
कृषी संजीवनी कार्यक्रम २०२२-२३ च्या अनुषंगाने आज हनुमान मंदिर खैरे वस्ती, मौजे राजेगाव याठिकाणी महिला कृषी तंत्रज्ञान सक्ष्मीकरण दिवस साजरा केला यावेळी मंडल कृषी अधिकारी श्री.फडतरे साहेब उपस्थित होते.यांनी कृषी क्षेत्रामधील महिलांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित कृषी सहाय्यक श्री तापकिरे सर यांनी महिलांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महाडीबीटी योजना यांविषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक श्री. कदम सर यांनी पी. एम्.एफ्.एम्.ई. योजनेची माहीती दिली. कृषी सहाय्यक ज्योती भोसले मॅडम यांनी मग्रारोहयो अंतर्गत बांधावर फळबाग लागवडीविषयी माहीती दिली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले संसाधन व्यक्ती श्री. संदीप दसवडकर यांनी महिलांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहित केले. सदर कार्यक्रमासाठी जगदाळे सर कृषी सहाय्यक लोणारवाडी हेदेखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ढवळे तेजश्री ,कृषी सहाय्यक राजेगाव यांनी केले. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.