
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
H.O.W फाऊंडेशन यांच्या वतीने पुणे ते पंढरपूर पालखी सोहळ्यात स्वच्छ- वारी, निर्मल- वारी या उपक्रमाअंतर्गत आषाढी वारीतील हडपसर येथे मुक्कामी दिंडीतील १०,००० वारकऱ्यांना नाष्टा, केळी व राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्यात आले. वारी मार्गावर वारकऱ्यांनी मोबाईल टॉयलेट चा वापर करावा , कचरा रस्त्यावर न टाकता कचरापेटीतच टाकला पाहिजे अश्या प्रकारची संस्थेकडून जनजागृती करण्यात आली.
तसेच मानवी अवयवदान करणे का गरजेचे आहे, याचे प्रबोधन केले व मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही नवीन संकल्पना वारकऱ्यांना प्रचलित करून दिली .हा जनजागृती उपक्रम पंढरपूर पर्यंत राबवण्यात येणार असल्याची माहिती माहिती संस्थेचे उपक्रम प्रमुख राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. मनोज गुंजाळ यांनी दिली. आजपर्यंत संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक व जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. यावेळी संस्थेचे अमृत वानखडे, अशितोष खाडे, प्राजक्ता जाधव,शिवम कोल्हे,अभिजित दुपारगुडे, तेजल खाटीकपाटील ,ऐश्वर्या दोपारे इत्यादी स्वयंसेवक उपस्थित होते..