
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी:-सुशिल घायाळ
मंठा :- छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये जय भिम सेनेचा महामेळावा संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. समाज बांधवांना संबोधित करताना सुधाकर निकाळजे म्हणाले की, समाजाच्या निधीवर दरोडा टाकणाऱ्या धडा शिकवला जाणार नगरपंचायत नगरपरिषद ग्रामपंचायत यांनी दलित वस्ती सुधार योजना समाज कल्याण चा निधी तो योग्य रित्या समाजासाठी खर्च करावा नाहीतर निधी येतो आणि खर्च दुसरीकडे होतो हा कार्यक्रम ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत जिल्हापरिषद महानगरपालिका यामध्ये होतो.
आमचा विरोध कुठल्याही आंबेडकरी चळवळीला नसून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जय भिम सेना आगामी काळात चालणार आहे. जालना जिल्ह्यातील चार दलित बांधवांची हत्या झाली त्याचा उलगडा अद्यापही झाला नसून आगामी काळात पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोठे आंदोलन उभा करणार असे सुधाकर भाई निकाळजे म्हणाले. यावेळी मंचावर अण्णासाहेब चितेवर, डॉ दीपक भदरगे, राजेश खंदारे, रमेश आवारे, उद्धव सरोदे, भिमराव वाघ, विनोद मस्के, विलास बनसोडे, राज खनपटे, कपिल साखरे, पिराजी पवळे, सिद्धार्थ देशमाने देविदास घुले मिलिंद देशमाने, भगवान हिवाळे, महादेव पाखरे, जयश्री पवार, सरस्वती वाघमारे, आकाश मस्के, दादासाहेब वाघमारे, भरत मोरे, दीपक वक्ते, विनोद वाघमारे सिद्धू कातुरे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना निकाळजे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने एकमेव प्रथम पसंतीचे उमेदवार आमचे नेते चंद्रकांत हंडोरे यांना दिले आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी गद्दारी करणे हे कितपत योग्य आगामी काळात काँग्रेस पक्षास धडा मतदान पेटी मधून शिकवला जाईल असे सुधाकर निकाळजे म्हणाले यावेळी दीपक गोंडगे विलास सरोदे भीमराव मोरे भिवा साळवे सुजित खनपटे गौतम वावळ बाळू वाटोळे विश्वनाथ घोडके आर्या मोरे किशोर घुगे सुरज वाकडे राहुल भादर्गे अजय भुतकर वैभव गवळी दादासाहेब कोळी अमर जाधव बाबासाहेब ठाकरे मारुती शिंदे माधवराव घोडे प्रभू आखाडे आकाश व टुडे प्रकाश सोनपसारे दिलीप खानापुरे विजय भुतकर प्रशांत मोरे प्रकाश मोरे मनोज मोरे सखाराम मोरे माधव मोरे आकाश मोरे मोरे भारत मोरे संतोष धाकर्गे श्रीमंत घुगे सिद्धार्थ हिवाळे पप्पु हिवाळे किरण साळवे नवनाथ भवाळे बाळू गवळी सुरेश वाघमारे आनंद मोरे यांनी श्रम घेतले तर संचलन प्रा आर एस गायकवाड यांनी केले.