
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते कैलासवासी महादेवराव बोडकेदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 15 युक्त आयोगातून शालेय क्रीडा साहित्य राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या सहकार्याने व माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या पाठ पुराव्यामुळे क्रीडा साहित्य मिळाले. लोकनेते कैलासवासी महादेवराव बोडके दादा माध्यमिक विद्यालयासाठी शालेय क्रीडा साहित्य मिळालेले आहे. ग्रामीण भागातील पिंपरी बुद्रुक येथील प्रसिद्ध आसलेले माध्यमिक विद्यालयासाठी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शालेय क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यालय व सर्व शिक्षक तसेच माजी सरपंच श्रीकांत बोडके,, विद्यमान सरपंच ज्योती बोडके,, उपसरपंच पांडुरंग बोडके,, समाधान बोडके,, आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते,, व ग्रामपंचायत सदस्य आणि पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थ यांच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार व्यक्त केले.
माध्यमिक विद्यालयासाठी मिळालेले क्रीडा साहित्य विद्यालया कडे सुपूर्त करीत आसताना माजी सरपंच श्रीकांत बडके, विद्यमान सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच पांडुरंग बोडके, समाधान बोडके, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग व पिंपरी बुद्रुक येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.