
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे देशांमधील युवकांमद्धे रोष
अमरावती :-केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध होत असतांना दिसत आहे.अश्यातच आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशातील युवकांच्या भविष्याचा विचार करत काँग्रेस पक्ष अमरावती ग्रामीणच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज देशांतील युवकच नव्हे तर केंद्र सरकार वगळता इतर पक्ष सुद्धा आवाज उठवितांना दिसत आहेत.आज दि.२७ जून २०२२ सोमवारला मा.नानासाहेब पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष अमरावती ग्रामीणच्या वतीने प्रमोद पाटील दाळू तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक येथे अग्निपथ योजनेविरुद्ध आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की,भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली परंतु या योजनेमुळे देशांतील तरुणांचे भवितव्य धोक्यात असल्याचे यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील दाळू यांनी म्हटले.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशांतील युवकांमद्धे प्रचंड रोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली अग्निपथ योजना तरुणांवर अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे देशातील तरुणांचा विचार करून ही योजना त्वरित रद्द करण्यात यावी असे सुद्धा प्रमोद पाटील दाळू यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले.
या आंदोलन दरम्यान अंजनगाव सुर्जी काँग्रेस पक्षाचे जमीर शेख,निखिल कोकाटे,अंकुश खाडे, राहुल पाटील,विनोद हाडोळे,विदर्भ कुमार बोबडे,विपुल नाथे,गजानन सरोदे,अंकुश सरोदे,दिलीप देशमुख,रामदास पोवार,बबलू काळमेघ,संजय सरोदे,रघुनाथ अलटकर,ऋग्वेद सरोदे,शुभम तायडे,साहेबराव सदांशीव,किस्मत अली,दिलीप खडगे,वासुदेव इंगळे,संतोष इंगळे,रमेश साबळे,तुलसीदास भोसले,पुरुषोत्तम घोगरे,मनोज लहुपंचांग,अजय डिके,शरद लबडे,मिर्झा जहिर बेग,नाजीम खतीब,गजानन आठवले,निलेश ढगे,सुयोग खाडे,सुधाकर खारोडे,किशोर मांगुळकर,अमर शिंगणे,रामेश्वर पानझाडे,राऊत सर,गजानन काळे,बाळू पाखरे,विजय वानखडे,अशोक वानखडे,शरद वानखडे,नाना पाटील गीते इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.