
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा पुसेगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी चौकांमध्ये मोटारगाडीतुन पळवून नेत यामध्ये लहान मुले व महिलांचे अपहरण करुन महिलेचा खुनाचा प्रयत्न करणार्यास अवघ्या तीन तासांत पुसेगांव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या अभिजीत ज्ञानदेव फडतरे ( वय३१ रा. फडतरवाडी ता. खटाव )असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन जयश्री महेश गोरे वय ३५ पती महेश ,मुले वेदांतिका वय ८ व विश्वजीत वय ४ महिने सर्व रा. रविवार पेठ सातारा) हे त्यांचे नातेवाईक उत्तम होळ व त्यांची मुलगी रुचिका उर्फ रुपाली वय २१ रा किंनहई ता.कोरेगाव) यांच्यासमवेत मोटार गाडी एम एच ११ जी सी ८१८१) शिंगणापूर येथून साताराकडे दि.२५ जून रोजी निघाले असता सदर गाडी पुसेगांव येथील छत्रपती शिवाजी चौकांत आल्यानंतर महेश गोरे व उत्तम होळ यांनी पाण्यांची बाटली विकत घेण्यासाठी गाडीतून उतरले असता सदर चालकांनी गाडीची धूम ठोकली गाडीतील इतरांनी चालकांला प्रतिकार केला असता यावेळी झालेल्या झटापटीत गाडी येरळा नदीच्या पुलावर बंद पडली गाडीतील लोकांनी आरडाओरडा केला असता संशयितांने जयश्री गोरे यांचा गळा दाबून खून करण्यांचा प्रयत्न केला असता अशी फिर्याद जयश्री गोरे यांनी पुसेगांव पोलीस ठाण्यांत दाखल करताच घटनेचे गांभीर्य लक्षांत घेताच पोलिस उपाधीक्षक गणेश केंद्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिसांनी छत्रपती शिवाजी चौकातील सी सी टीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरु करुन पुसेगांव मधील सर्व परिसर पिंजून काढला असता.गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम अवघ्या तीन तासांत पोलिसांच्या हाती लागला त्यांस पोलिस ठाण्यांत आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांस अटक केली सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ लोंढे यांच्यासह हवालदार एस.एस भोसले,डी बी बर्गे ,सचिन जगताप, सुनील अंबदागिरे,महेश पवार ,महिला पोलीस पी.एल.जगदाळे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल पुसेगांव परिसरांतुन तसेच सातारा जिल्हा प्रशासनाकडूंन कौतुक होत आहे