
दैनिक चालू वार्ता पालघर-प्रतिनिधी:-अनंता टोपले
दिव्य विद्यलाय अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा जव्हार जि. पालघर या शाळेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, शैक्षणिक आवड निर्माण व्हावी या निमित्ताने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमाला संस्थापिका श्रीमती प्रमिलताई कोकड, श्री ठाकूर गुरुजी शाळेतील शिक्षक , पालक व विद्यार्थी उपस्थित होते. आज केलेला विद्यार्थ्यांचा सत्कार भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. असा हा सत्कार समारंभ मोठ्या आनंदात, उत्साहात संपन्न झाला.