
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.संबंधितांनी ती पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.त्याचप्रमाणे,ई-केवायसी पूर्ण करण्यास दि.३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय याद्या amravati.gov.in संकेतस्थळावर ‘सूचना-घोषणा’ (अनाऊन्समेंटस्) शीर्षाखाली प्रसिध्द करण्यात येत आहेत.या यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि.३१ जुलै पर्यंत पूर्ण करावी.त्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधून,तसेच pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नर-ई-केवायसी न्यू हा पर्याय निवडून करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.