
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
कंधार:-शासन आदेशानुसार राज्यस्तरीय सुवर्ण जयंती राज्यस्व अभियान कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला असून त्या अनुषंगाने विभागीय जिल्हा स्पर्धाही शासनाने घेतल्या असून त्यात नांदेड जिल्ह्याला त्यांचे बक्षीसही मिळाले आहे पण कंधार तालुक्यात राज्यस्व अभियान फारसा राबविण्यात आला नाही हा कार्यक्रम लोक उपयोगी असूनही आपण सदरील कार्यक्रम गांभीर्याने राबवला नाहीत तेव्हा आता तरी आपण हा कार्यक्रम कंधार तालुक्यात राबविण्यात यावा अशी मागणी जाधव व्यंकटी,पांडुरंग कंधारे यांनी तहसीलदार साहेब कंधार यांना केली आहे.