
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
धनकवडी येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने आयोजन
–
पुणे – नुकत्याच झालेल्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षेत यश संपादन केलेल्या १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि १० वी , १२ वी नंतर पुढे काय? या विषयावरील करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन धनकवडी येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
धनकवडी येथील पुर्ती हौसिंग सोसायटीच्या हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमास परिसरातील यशस्वी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पालक व विद्यार्थांना १० वी , १२ वी नंतर पुढे काय? या विषयावर डॉ अरुण शिंदे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
यावेळी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबतच शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पद भूषविणारे परिसरातील वकील,इंजिनियर ,पोलीस,शिक्षक,फोटोग्राफर तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खेळाडूंना आणि त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांना शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले..!
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कबड्डी राष्ट्रीय खेळाडू नंदकुमार काळोखे सर होते तर खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी जयनाथ तालीम संघाचे वस्ताद व माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे,जवाहर कुस्ती संकुलाचे संस्थापक सुनील शेटे उपस्थित होते…
या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुमित शिर्के,उपाध्यक्ष शुभम आबनावे,कार्याध्यक्ष मानस भालेकर ,सचिव पियूष नवघणे, रोहन जेधे तसेच मंडळाचे आजी माजी पदाधिकारी सभासद यांनी केले होते. मंडळाचे ज्येष्ठ सभासद भारत आबनावे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.