
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मंत्र्यांचा आमदारांनी बंडखोरी केली असली तरी, सर्वसामान्य शिवसैनिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा संदेश देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने दिनांक 29 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नांदेड शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
मालेगाव रोडवरील गजानन मंदिर येथून ही रॅली काढण्यात येणार असून, त्याचा समारोप आयटीआय चौक येथे करण्यात येणार आहे, या रॅलीत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.