
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी- प्रमोद खिरटकर
विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत पंचायत समिती कोरपना. पशुसंवर्धन विभाग, माविम आणि उमेद च्या सहकार्यांने विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत VC द्वारे पशुसखींचे एकदिवसीय प्रशिक्षण पंचायत समितीचे सभागृहात घेण्यात आले. मदर डेअरी धारक , उमेद व माविम बचत गट यांचे करिता एक दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाअंती डॉ. संदिप राठोड कार्यक्रमांची संकल्पना व पशुसंवर्धन विभागातील विविध योजनां बद्दल ची माहिती तसेच या योजनांविषयी जास्तीत जास्त जण जागृती व्हावी या दृष्टीने उपस्थित वर्गाला माहिती दिली. या कार्यक्रमाला उमेदच्या सौ. अर्चना बोनसुले, तालुका समन्वयक, डॉ. संदिप राठोड पविअ (विस्तार) पंचायत समिती कोरपना. डॉ डी आर नागले पशुधन विकास अधिकारी फिरते पशुचिकित्सालय गडचांदूर. डॉ जे एम बोढे, डॉ ढेंगळे, डॉ झाडे, डॉ तिनखेडे, डॉ पिदुरकर डॉ सौ. इंगोले मॅडम, श्री बिस्वास मदर डेअरी,श्री जिवने कृषी व्यवस्थापक, श्री किन्नाके कृषी व्यवस्थापक व परिचर वर्ग इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमास ४९ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सांगता डॉ. डी आर नागले पविअ यांनी केले.