
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवी सरकार इंगळी
खानदेश मराठी साहित्य संघ शाखा सुरत गुजरात येथे म.जोतीबा फुले सेवाभावी ट्रस्ट आयोजित साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलन अध्यक्ष सदाशिव सुर्यवंशी
अध्यक्ष खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य धुळे तर संमेलनास उद्घाटन विनोदवीर टी .व्ही. कलाकार शामसुंदर राजपूत आणि कविसमेलन अध्यक्ष कवी देवदत्त बोरसे नाशिक हे होते कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून संमेलनास सुरवात झाली. संमेलनात कवि विजय कांबळे मुंबई ,पाहूणे विजयाताई मानमोडे आहिराणी कस्तुरी परीवार पुणे रमेश राठोड सचिव खान्देश साहित्य संघ जया नेरे वनमाला पाटील जालना प्रविण माळी( एकपात्री अभिनेता) राजेंद्र जाधव,
भाग्यश्री बागड ,जयराम मोरे मिना सैंदाणे, प्रविण पवार, कवळीथकर , कवी शिवानुज यांनी सहभाग नोंदवला. आयोजक जितेंद्र बहारे सुरत शाखा अध्यक्ष विकास पाटील सचीव सुरत शाखा यांनी आभार मानले.