
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीत यश संपादन करणार्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शेटफळ हवेली येथे सोमवार दि.२७ जुन रोजी आयोजित करण्यात आला होता.
तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांच्या वतीने ह्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आज शेटफळ हवेली गावातील विद्यार्थ्यां चि.सज्जन हसमुख पवार इ.बारावी मध्ये ९१.६७% ,चि.तेजस दत्तात्रय बनकर, इयत्ता दहावी ८८.६०% कु साक्षी राजेंद्र शिंदे ८७.४०% उत्कृष्ट गुण संपादन करून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी नितीनजी शिंदे यांनी बोलताना विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावीची परिक्षा म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे . प्रत्येक वेळी अपेक्षेएवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा कोणत्या,एखादे क्षेत्र निवडताना त्याबद्दलची माहिती कशी मिळवावी तसेच बदललेल्या परिस्थितीचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करावे याबाबत आपले मत व्यक्त केले.
कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात, कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत.कष्ट करण्याची सवय ठेवा . कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपण ज्या वेळेस एका मोठ्या पदावर जाल त्यावेळी आपल्या हातून सर्वसामान्य लोकांची काम व्हावीत ही अपेक्षा, आपल्या आयुष्याचा शैक्षणिक दृष्ट्या हा टर्निंग पॉईंट आहे, तसेच आपल्या आई-वडिलांनी ज्या कष्टातून आपल्याला शिक्षण दिले आहे, त्यासाठी त्यांची सेवा करायला विसरू नका हे पण आवर्जून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाच बळ द्या आणि आपल पुढील आयुष्य उज्ज्वल बनवा असे आवाहन तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी केले .
यावेळी, तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे, संभाजी शिंदे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब पवार, विजय शिंदे,आमोल शिंदे, दिपक शिंदे, सतिश चव्हाण ,स्वप्निल शिंदे,माऊली चव्हाण, राजेंद्र पवार, दत्तु बनकर, हसमुख पवार व ग्रामस्थ उपस्थित होते