
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दि 24 जून ला रात्री रिक्षाने प्रवास करताना एका मुलीचा लॅपटॉप गडबडीत रिक्षामध्ये विसरला होता. रात्रीपासून त्या रिक्षाचा तपास करण्याचे काम सुरू होते ,परंतु बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही तपासूनही रिक्षाचा नंबर मिळत नव्हता. आज 25 जून दुपारी साडेबारा वाजता ज्या मुलीचा लॅपटॉप हरवला होता तिच्या मोबाईल नंबर वर सदर रिक्षाचालकाने फोन केला व लॅपटॉप आणून देतो असे सांगितले ,त्यावेळी सदर लॅपटॉपचा तपास करण्यासाठी असलेले पोलीस नाईक गोरे ही सोबत होते .या प्रामाणिक रिक्षाचालकाने तो लॅपटॉप सुखरूपपणे पोलिसांच्या ताब्यात दिला व त्या मुलीला तिचा लॅपटॉप सुपूर्त करण्यात आला .त्या प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव प्रदीप वसंत जगताप आहे. त्याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस प्रशांत गांधी यांनी केला .आपल्या मौल्यवान वस्तू सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना जपून ठेवाव्या व आठवणीने आपल्या ताब्यात घ्याव्यात, यामुळे कोणालाही मनस्ताप होणार नाही तसेच रिक्षाचा किंवा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या वाहनाचा क्रमांक देखील प्रवाशांनी नोंद करून घ्यावा.जेणेकरून असा प्रकार घडल्यानंतर हरवलेली वस्तू लवकर मिळण्यास मदत होईल असे पोलिसांनी आवाहन केले .याप्रसंगी वरिष्ठ पो.नि अशोक इंदलकर स्वारगेट पोलिस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कीर्ती चाटे, पोलीस नाईक चेतन गोरे , आकांक्षा आठवले ,सांगोलकर मॅडम उपस्थित होते.