
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पिंपरी: त्रस्त नागरिकांनी वारंवार विनंती अर्ज, निवेदने देऊनही पिंपळे निलख, विशालनगर या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात पाण्याची टंचाई आणि गढूळ पाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे लोकं हैराण असून गढूळ पाण्यामुळे काही आजारपणाची लक्षणे आढळून आली आहेत. अशीच परिस्थिती यापुढे कायम राहिल्यास पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना काळे फासू , असा इशारा काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सचिन साठे यांनी सोमवारी जनसंवाद सभेत दिला. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याकडे साठे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. पिंपळे निलख, विशाल नगर भागात अपुऱ्या, अनियमित व दुषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत. या भागात सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांचा आतापर्यंत पाण्याच्या टँकरसाठी लाखो रूपयांचा खर्च झाला आहे. मनपा प्रशासनावर आयुक्तांचा वचक राहिलेला नाही असे सर्वत्र बोलले जात आहे.