
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे: – चांगल्या व गुणवान व्यक्तींना हेरून त्यांच्यात आत्मविश्वास भरून जागतिक स्तरावर चमकविण्यात वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व अभिनव खान्देशचे संपादक मा.श्री प्रभाकरराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. डब्ल्यूसीपीए तर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ ” च्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
श्रीरामपूर येथील व्हिआयपी गेस्ट हाऊस सभागृहात झालेल्या आकर्षक समारंभात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैयक्तीक व संस्थात्मक पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले.
श्रीरामपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड च्या स्वारगेट डेपोत वाहक पदावर कार्यरत असलेल्या प्रशांत शंकर भोसले यांना महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधून २०२२ चा वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रभाकर सुर्यवंशी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्ह व वर्ल्ड पार्लमेंटचे सदस्यत्व ( जागतिक खासदार पद ) देण्यात आले. प्रशांत भोसले हे पीएमपीएमएलच्या स्वारगेट डेपोत गेली दहा वर्षे प्रामाणिक पुणे सेवा करत आहेत.कोविड सारख्या महामारीत त्यांनी स्वतः ची व आपल्या कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला पुर्णपणे कोविड ग्रस्तांसाठी झोकून दिले होते.अनेक कोविडग्रस्त पेशंटला वेळेत हाॅस्पिटलमध्ये पोहोचविणे,त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करून देणे.त्यांच्या या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल वर्ल्ड काॅन्स्टिट्युशन ॲन्ड पार्लमेंट असोसिएशनने घेऊन त्यांना सामाजिक कार्यातून २०२२ वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड देऊन गौरवान्वीत करण्यात आले.
मा. श्री. प्रसन्नकुमार धुमाळ यांनी आपल्या मधाळवाणीने जानदार सुत्रसंचलन करून कार्यक्रमात रंग भरले. शेवटी प्रा.अक्षय तेलोरे यांनी उपस्थितांचे आभार प्रकट करून एका रंगतदार सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डब्ल्यूसीपीएचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन मार्टीन, उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, सचिव बाबासाहेब वाकचौरे, सहसचिव ऋषिकेश विघावे यांनी विशेष प्रयत्न केले.