
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:विना अनुदानित व अंशतः अनुदानीत शाळा तसेच नैसर्गिक तुकड्या वाढीवरील शिक्षकांना सेवासंरक्षण देऊन त्यांचे त्वरित समायोजन करा अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तथा भाजपा शिक्षक सेलच्या सहसंयोजिका संगीता शिंदे यांनी शिक्षण सचिव यांना केली आहे. राज्यामध्ये विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व नैसर्गिक१५ ते १६ वर्षांपासून काम करीत आहेत. काही शिक्षकांना २० टक्के तर काही शिक्षकांना ४० टक्के वेतन अनुदान मिळते तर बहुसंख्य शिक्षक हे विनावेतन विद्यादानाची पवित्र सेवा देत आहेत. पटसंख्या कमी •● झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त झाल्यास १०० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांचे समायोजन होते परंतु अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळा तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्या वरील शिक्षक अतिरिक्त झाल्यास त्यांचे समायोजन होत नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ समायोजन करण्याची मागणी संगीता शिंदे यांनी शिक्षण सचिव यांना केली आहे