
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम :-दहावी बारावीतील गुणवत्ता भविष्य काळासाठी भक्कम पाया आहे. यापुढील काळात सुद्धा अशाच प्रकारे सातत्याने प्रयत्न करणे गरज आहे. तरच स्पर्धेच्या युगात आयुष्यात सोनेरी दिवस पाहायला मिळतील. असा दावा कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या प्रसंगी बोलताना केला
रविवार दिनांक 26 जून 2022 रोजी समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गुणगौरव करण्यात आला.
. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी भागवत ढवळशंक. कृषी अधिकारी महादेव आसकर . एसबीआय बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विजय खामकर . आदर्श पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मारुती टकले. महावितरण आदर्श कर्मचारी सतीश दाते. कोष्टी समाजाचे राष्ट्रीय सचिव उमेश ढगे. नगरसेवक सागर टकले. सविता विजयकुमार बागडे . गीता रोकडे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमातून इयत्ता दहावीमधील 26 विद्यार्थ्यांना व बारावीतील 22 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग . रजिस्टर . छत्री . पेन असे जवळपास पंधरा हजार रुपयाचे साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पत्रकार शंकर खामकर . विठ्ठल बागडे. संतोष गुरसाळे. दत्ता बोत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले .