
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
पेठवडज:- मौजे पेठवडज येथील महावितरण कार्यालयात एक वर्षापासून ज्यूनियर इंजिनिअर कायम स्वरुपी नाही येथे तात्पुरत्या इंजिनिअरची नेमणूक केली आहे आणि तो पेठवडज येथे कार्यालयात वेळ देत नाही आणि पेठवडज कंधार तालुक्यातील मोठे सर्कल असून शिरशी(बु.),शिरशी(खु.),गोणार येथील गावातील विद्युत पुरवठा लोडशेडींग व्यतिरिक्त म्हणजेच चालू काळात तासण-तास पुरवठा बंद चालू करून ग्रामीण भागातील ग्राहकांनी संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता आम्हाला काहीच माहित नाही व आमच्याकडे काही नाही असे बिनबुडाचे उडवाउडवीचे उत्तर दिल्या जाते. यामुळे मौजे.पेठवडज येथील ज्यूनियर इंजीनियर ची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची जाधव व्यंकटी, पांडुरंग कंधारे यांनी उप.कार्यकारी अभियंता विद्युत पुरवठा कंपनी कंधार यांच्याकडे मागणी केली आहे.