
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
कागणेवाडी ;- कंधार तालुक्यातील कागणेवाडी ते कळका रस्त्यावरील पुल गेले वर्षी वाहून गेला असून अतिवृष्टीमुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठे मोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाला अनेक वेळा सूचना देण्यात आल्या असून आतापर्यंत डागडुजी सुद्धा केली नाही. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नवीन प्रवासी सांयकाळी खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन पुलाची दुरूस्ती करावी अशी वरवंट, मंगनाळी, कळका, कळकावाडी, कागणेवाडी, बोरी (बु.), टोकवाडी, नावंदेवाडी येथील प्रवासी नागरीकांनी मागणी केली आहे. तसेच उपोषणाचा ईशारा दिला आहे.