
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
दरोडीच्या युवकाचा नवी मुंबई व्यवसाय!
माजी ना. विजय औटी यांनी दिलेल्या शुभेच्छा!
—————————————
दरोडी/पारनेर:-नवी मुंबई, कळंबोली येथील स्टिलेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभारुन दरोडीचे सुपुत्र अविनाश उर्फ बापू शेठ कड यांनी जवळपास दोन कोटींच्या पुढे गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केलेला आहे. या व्यवसायास नवी मुंबई येथे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते.
युवकांनी कोणताही छोटा-मोठा व्यवसाय करून आपले करियर करावे आज त्यातच उज्वल भविष्य आहे. कोणत्याही उद्योग धंद्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस सोसल्यास, नक्कीच उज्वल भविष्य असते. त्यामुळे तरुणांनो व्यवसायात हार न पत्करता तो तसाच पुढे चालू ठेवला तर त्याचा फायदा नक्कीच होईल आणि आपले व आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावले शिवाय राहणार नाही असे भोसले यांनी सांगितले.
यावेळी कंपनीचे मालक अविनाश उर्फ बापूशेठ कड यांनी सांगितले की या मशीन साठी जवळपास ८५ लक्ष रुपयांची गुंतवणूक करावी लागते. या मशिनद्वारे
➡️ शीट टु शीट N4pvc/2Bpvc कटिंग, ➡️ क्वालिटी, स्टार्टसलिस कटिंग पेपर, ➡️ टेबल टॉप शीट कटिंग, ➡️ एक्सपोर्ट पॅकिंग करणे ही कामे केली जातात. मी सन २००८ साली मुंबईला गेलो तेथे माझे स्वतःचे कोणीही नातेवाईक नसताना अडीच हजार रुपयात नोकरी शोधली. नोकरी लागल्यानंतर जेवणासाठी खानावळ लावली माझे आई-वडील गावी दरोडीला शेती करत आहेत. काही दिवसांनी दुसरी कंपनी पाहिली तेथे काम करू लागलो त्यातून काही रक्कम जमा झाली त्यानंतर तिसर्या तिसरी कंपनी पाहिली येथे काम करू लागलो. परंतु स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द मनात होती आणि धाडस करून स्वतःची कंपनी उभारली. आज माझा व्यवसाय अतिशय चांगल्या स्थितीत आहे याचे मला समाधान वाटते.
शेतकरी कुटुंबातील तरुण नोकरीनिमित्त मुंबई जातो, आणि स्वतः चा व्यवसाय उभा करतो ही बाब तालुक्यातील तरुणांसाठी अभिमानास्पद आहे. याची प्रेरणा इतरांनी घ्यावी: काशिनाथ दाते सर, सभापती बांधकाम व कृषी समिती जि. प. अहमदनगर
यावेळी उद्योजक बापू शेठ कड, उद्योजक संदीप शेठ जाधव, सुखदेव शेठ कड, शिवाजी शेठ कड, प्रमोद आवारी इ. मान्यवर उपस्थित होते.