
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा:- श्री प्रदीप वाघ यांनी मोखाडा तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे अशा विद्यार्थ्यांना सन्मान पत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने प्रत्येक शाळेत कार्यक्रम आयोजित करुन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येत आहे,या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू असुन,वाकडपाडा हायस्कूल,आडोशी, आश्रम शाळा,कारेगाव आश्रम शाळा,मोहीते महाविद्यालय व खोडाळा हायस्कूल,सुर्यमाळ आश्रम शाळा येथे कार्यक्रम घेण्यात आले असून संपूर्ण तालुक्यातील शाळे मध्ये अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करणार आहोत.
यावेळी श्री प्रल्हाद कदम कदम, श्री अमोल जंगले गटशिक्षणाधिकारी, श्री प्रभाकर पाटील, श्री विष्णू हमरे, संजय वाघ, विठ्ठल गोडे, रमेश बोटे, गणेश वाघ,अनंता,वारे, नंदकुमार वाघ, निलेश ठोमरे,चुनिलाल पवार, श्री विरकर केंद्र प्रमुख, श्री बागुल ग्रामसेवक, श्री सुर्यवंशी ग्रामसेवक, श्री अमृता कडु, देवराम कडु, श्री अशोक वाघ, श्री मंगेश दाते, श्री रघुनाथ पाटील,भाऊ दोरे,श्रीमती मंदा पारधी ग्रामसेवक श्री घरटे सर मुख्याध्यापक, श्री ठवरे सर मुख्याध्यापक, श्री भोईटे सर मुख्याध्यापक, श्री कापडणीस सर मुख्याध्यापक, श्री अनिल पाटील प्राचार्य मोहीते महाविद्यालय इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.