
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेल्या सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण घेत असलेल्या १०० प्रशिक्षणार्थी मुलींना सिडको आदिवासी अधिकारी – कर्मचारी यांच्यामार्फत पोलीस भरतीसाठी आवश्यक अभ्यास साहित्य सर्वांना पुस्तके तसेच प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले. याप्रसंगी सिडकोचे अधिकारी श्री. संदीप साठे साहेब व सिडको अग्निशमन सेवेतील श्री. सुरज पाटील सर हे उपस्थित होते.तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा याबाबत सिडकोचे अधिकारी श्री.संदीप साठे साहेब यांनी विशेष मार्गदर्शन केले तसेच गणवेशधारी नोकऱ्याची माहिती व भरतीबद्दल मार्गदर्शन सिडको अग्निशमन सेवेतील श्री. सुरज पाटील यांनी केले. तसेच निवृत्त शिक्षक श्री. राजेंद्र जागले सर यांनी वेक्तीमत्व विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राला खुप वर्षांपासून अभ्यास साहित्याची उणीव होती ती सिडको आदिवासी बंधू ग्रुप यांच्यामार्फत भरून निघाल्याबद्दल सदर प्रशिक्षण केंद्राचे केंद्र प्रमुख माजी सैनिक NSG कमांडो श्री. वसंत तुंबडा सर यांनी आभार वेक्त केले. तसेच प्रशिक्षनार्थी मुलींनी आम्हाला मार्गदर्शनाचे सहकार्य मिळावे अशी इच्छा वेक्त केली तसेच वेळोवेळी सिडको आदिवासी बंधू ग्रुपकडून आवश्यक ती मदत केली जाईल याबाबत हमी दिली. सदर पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व सिडको आदिवासी अधिकारी व कर्मचारी यांचे आभार वेक्त केले