
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
लासूर स्टेशन ते दिवशी पिंपंळगावच्या नाशिक महामार्गपर्यंत खड्डेच खड्डे पावसाने साचले तळे, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय कसरत……
रस्त्याच्या निविदा निघून झाले तीन वर्ष मात्र कामाला मुहूर्त लागेना….
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन, डोणगाव, रायपूर रस्ता जीवघेणा झाला असून रस्त्यात खड्डा कीं खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने ऐन पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी सांचल्याने शाळकरी मुलांना मात्र या रस्त्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र या रस्त्याच्या निविदा निघून झाले तीन वर्ष मात्र कामाला मुहूर्त लागला नसल्याने डोणगाव, रायपूरकरांचा रस्ता मात्र खडतर झाला आहे.
मागे धामोरीचे उपसरपंच रवींद्र पाटील चव्हाण यानी या रस्त्यासाठी कार्यकारी अभियंता यांना खुर्चीखाली फटाके फोडो आंदोलनचा इशारा दिला होता त्यामुळे सामाजिक बांधकाम विभागाने तात्काळ ठेकेदाराला काम करण्याचे आदेश दिले होते मात्र सदर ठेकेदारांनी थातूरमातुर काम करून खड्डे बुजवले व साईडचे झाडे काढले होते मात्र पुन्हा रस्त्याचे काम बंद झाले असल्याने पहिल्याच पावसात लासूर ते डोनगाव/रायपूर पर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी सांचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्यानें अनेक दुचाक्या व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन दुखापती होऊन जखमी झाल्या मात्र अजूनही ठेकेदारानें पुन्हा चालू करण्याचे काम पालकांतून व प्रवश्यातून होते आहे