
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील पिसादेवी परिसरात आज सकाळी उघडकीस आली.
वैष्णवी किशोर सोनवणे (वय.17) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.