
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
संबंध जीवसृष्टीच अस्तित्व धोक्यात येऊ देयच नसेल तर वेळीच लक्ष देऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. आणि त्यातील महत्वाची बाब म्हणजे योग्य वेळी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन व रक्षण करण आवश्यक आहे .
पृथ्वीवरील समस्त प्राणीमात्रांच हित व कल्याण हे निसर्गाच्या समतोलावर अवलंबून आहे . मानवाच्या आशा ,अपेक्षा, महत्वकांक्षा मुळे निसर्गाच संतुलन बिघडले आहे हे वास्तव आहे.परंतु वेळ आजुन गेलेली नाही आपण हा असमतोल दूर करून पुन्हा समतोल निर्माण करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक आहे.ते स्व इच्छेने वृक्षारोपण करण्याची .समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी निसर्गाच् संवर्धन व रक्षण गरजेचे आहे . निसर्ग टिकला तर मानव टिकेल . आपण कितीही प्रगती केली तरी सुद्धा आपण निसर्गाच्या समोर हतबल आहेत . अनेक अनमोल मौल्यवान,वस्तू संपदा , प्राण वायु, गुणकारी औषधी वनस्पती आपल्याला निसर्गा कडुन मिळतात . निसर्गाच हे ऋण आपण तहयात फेडु शकत नाहीत मात्र या ऋणातुन मुक्त होण्यासाठी व निसर्गाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपण वृक्षारोपण करू शकतो .करोना कालखंडातील भिषण वास्तव आठवलं तरी अंगावर शहारे येतात सगळीकडे हाहाकार उडाला होता. ऑक्सिजन ऑक्सिजन हा एकच शब्द सगळीकडे कानावर पडायाचा किती हि पैसे मोजले तरी अनेक लोकांना ऑक्सिजन मिळु शकला नाही . पण वेळ निघून गेली कि आपण विसरलो . उलट आपण आता या घटनेनंतर सावध झाला पाहिजे . आणि हा मोफत वृक्षा पासुन मिळणारा ऑक्सिजन आपल्यासाठी व आपल्यला पुढच्या पिढीला पुरेशा प्रमाणात मिळाला पाहिजे.यासाठी निसर्गाच संतुलन टिकुन ठेवण्यासाठी प्रत्येकाने वन रक्षण वन, संवर्धन, वृक्षारोपण हे कृतीतून दाखवले पाहिजे . आणि यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
सध्याची विद्यमान परिस्थिती पाहता दैनंदिन आवश्यक असणारा प्राण वायु जो वृक्षा पासून मिळतो .त्याची उपलब्धता आणि भविष्यातील गरज याच मंथन आणि चिंतन हे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस वाढत औद्योगिकीकरण,जे रोजगार आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत आवश्यकच आहे . तसेच वाढत असलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने तुफान वेगाने वाढत शहरीकरण व वेगवेगळ्या पायाभूत सुविधा यांच्या विकास कामांच्या अनुषंगाने होणारी बेसुमार वृक्षतोड हि निश्चितच चिंतेची बाब आहे. पण विकास काम हि बंद ठेवता येणार नाहीत .हे सत्य नाकारता येणार नाही . मग निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व हि तुट भरून काढण्यासाठी प्रभावी उपाय हाच आहे कि वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आणि प्रभावी उपाय आहे . म्हणून भविष्यातील पिढी च भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर निसर्गाचा समतोल हा राखावाच लागेल .आणि त्यासाठी वृक्षारोपण करण गरजेच आहे . आणि त्यासाठी सुयोग्य वेळ हिच आहे . मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळण्यासाठी . तसेच वायु प्रदूषणा पासुन संरक्षण होण्यासाठी व नियमित वेळेवर आणि पुरेस पर्जन्य होऊन दुष्काळाचा सामना करावा लागु नये म्हणून व आपल्या सह आपल्या भावी पिढीला विविध प्रकारची फळे , व विविध संपदा वेळोवेळी आवश्यकतेनुसार ऋतु नुसार उपलब्ध व्हावेत म्हणून योग्य वेळी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय व उत्तम असा उपाय आहे.वृक्षारोपण हि लोकाभिमुख चळवळ झाली पाहिजे.तसच त्याच महत्व घराघरात पोहोचले पाहिजे .व स्वयंप्रेरणेने प्रत्येका व्यक्ती ने आपल कर्तव्य व जबाबदारी समजुन किमान एक वृक्ष दरवर्षी पावसाळ्यात लावला पाहिजे . जेणेकरून निसर्गाच समतोल अबाधित रहिल .आणि आपल्या येणार्या पिढीच्या हितासाठी आपण काही तरी केले आहे याचं खूप मोठं समाधान हे नक्कीच आपल्याला मिळेल . शासन सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर वृक्षारोपण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत असत .परंतु आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपला सुद्धा सक्रिय सहभाग असला पाहिजे . आणि विशेष असे व्यक्तिगत प्रयत्न केले पाहिजे. वृक्षारोपण करण्यासाठी शासनाचे प्रयत्न खुप प्रमाणिक असतात . परंतु त्याला स्वयंप्रेरणाची जोड देऊन लोकाभिमुख चळवळ निर्माण झाली पाहिजे . आणि असं झालं तर नक्कीच त्याचे योग्य परिणाम आपल्याला दिसतील या मध्ये शंका नाही. आपल्याला आवश्यक असणारा प्राण वायु हा कुठल्याही परिस्थितीत विकत मिळत नाही .याचा अनुभव आपण घेतला म्हणूनच पुन्हा अशी वेळ आपल्यावर व आपल्या येणार्या पिढीवर येऊ नये असे वाटत असेल तर निसर्गाच महत्व वेळीच जाणल पाहिजे.आणि निसर्गाच्या उपयुक्ततेचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे . वृक्ष हि संपदा,व अनमोल संपत्ती आहे. म्हणून वृक्ष हे जीवनदाते म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही . सध्याचा असणारा नैसर्गिक असमतोल दुर करण्यासाठी . व भविष्यातील येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी निसर्गाचं संतुलन टिकवून ठेवण् आवश्यक आहे . म्हणून हिच योग्य वेळ आहे. वृक्षारोपण करण्याची तसेच वृक्षारोपण करण्याचा संकल्प पुर्णत्वास घेऊन जाण्याची कारण राज्यात मान्सून सक्रिय होत असताना खरंया अर्थाने आता वृक्ष लागवड करण अपेक्षित आहे .जेणेकरून केलेले वृक्षारोपण यशस्वी होऊ शकत . म्हणून जर आपल्याला वृक्ष लावण शक्य होत नसेल तर आपण वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया ओसाड किंवा ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी योग्य व सुरक्षित जागा आहे .त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया सुद्धा टाकु शकतो . एरव्ही आपण वृक्षारोपणा च्या अनुषंगाने वेगवेगळे दिन विशेष साजरे करतो . आणि तो दिवस पुर्ण झाला कि विसरून जातो .मग वृक्षारोपण फक्त सोशल नेटवर्क पुरत मर्यादित राहत .आपला तो उत्साह फक्त सोशल मध्यमा पुरता मर्यादित न रहाता तो वास्तविक सत्या मध्ये कृतीत रूपांतरित होण्यासाठी चा प्रयत्न होण गरजेच आहे . वृक्ष फक्त प्राणवायू देतात का तर नाही . प्राण वासु सह अनेक अनमोल असे अनेक फायदे वृक्षा पासून आपल्यला मिळतात . त्यापैकी जवळपास आपल्या दैनंदिन आहारातील अनेक स्वादिष्ट फळ आपल्यला वेगवेगळ्या वृक्षापासुन मिळतात . अनमोल असं लाकुड सुद्धा आपल्याला वृक्षा पासून मिळत . वायुप्रदूषण वृक्ष नियंत्रित करतात . ज्या मुळे खूप मोठ्या नुकसाना पासुन आपला बचाव होतो . तसेच नियमित पर्जन्यमान होऊ शकत .व दुष्काळा सारख्या भयानक संकटापासून संरक्षण होऊ शकत .वृक्षा मुळं मृदा संधारण होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहते.तसेच निसर्गाचे संतुलन टिकुन राहण्यासाठी मदत होते . आणि म्हणूनच आपण या परिस्थितीत केलेली वृक्ष लागवड हि येणार्या पिढीच्या हितासाठी कल्याणासाठी खूप महत्वपूर्ण आहे. म्हणून खरया अर्थाने वृक्षारोपण करण्याची योग्य वेळ हिच आहे . आणि कृतीतून वृक्षारोपण केले पाहिजे .व आपल्या येणार्या पिढीचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर 9011634301