दैनिक चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधि मोहन आखाडे
जिल्हाधिकारी यांनी काल देभेगाव ता. कन्नड येथील न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली. मराठवाडा कॅडेट कोअरच्या विद्यार्थीनींनी केलेल्या पथसंचलन कार्यक्रमास उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण भागातील मुली मध्ये देशसेवेची प्रेरणा जागृत करून त्या विषयीचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापणाविषयी कौतुक केले. तसेच मुलींच्या शिस्तबद्ध जीवनाकडे वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच जीवनात यशस्वी होण्यासाठी ‘वाचन’ हे खूप महत्वाचे असून वाचाल तर जीवनात विविध संकटातून वाचाल असे सांगून निग्रहीपणे जीवनात उभे रहा, यासाठी परिश्रम आवश्यक असून यशस्वी जीवानासाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी देभेगावचे रहिवासी तसेच जागतिक किर्तीचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.विजय सुरासे यांची सहकुंटूब उपस्थिती होती.
देवळाणा ग्रामपंचायत कार्यालयास भेट देवून ग्रामीण भागातील रस्ते व इतर पायाभूत सुविधा विषयी जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या गावामध्ये डॉ. विजय सुरासे यांच्या मदतीमधून गावात स्वच्छ पाणी उपलब्धतेसाठी आरओ प्लॅन्टची पाहणी यावेळी केली. तसेच देभेगावच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. याच दौऱ्यादरम्यान देवगाव रंगारी येथील पोलीस स्टेशनला भेट देवून कायदा व सुव्यवस्था याविषयीचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी पोलीस निरिक्षक तात्याराव भालेराव तसेच सहायक पोलीस निरिक्षक डी.बी. खांडकुळे यांच्या समवेत चर्चा केली.