
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
शिरपूर तालुक्यातील मौजे असली व हिसाळे येथे कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. श्री एस डी मालपुरे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी रासायनिक खत बचत मोहीम, पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग,कृषी पायाभूत विकास निधी योजना, कापूस पिकातील मूल्य साखळी बळकटीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.पंकज पाटील यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान,जमीन आरोग्य पत्रिकेप्रमाणे खत व्यवस्थापन व मका पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी असली येथील प्रगतीशील महीला शेतकरी अनिता कोळी,दुर्गा कोळी यांचा राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स लिमिटेड यांचे वतीने बीजप्रक्रिया मोहिमेत प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हिसाळे गावचे प्रगतशिल शेतकरी श्री रामेश्वर पाटील,श्री हिरालाल परदेशी, दत्तू नाना,जितेंद्र परदेशी,पद्माकर पाटील,निंबा शिंपी व RCF कंपनीचे श्री त्रिलोकसिंग कछुवा उपस्थित होते तसेच असली गावच्या सरपंच सरलाबाई धनगर,पोलिस पाटील जितेंद्र कोळी,उखडू कोळी,पांडुरंग धनगर उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी योगेश सोनवणे तसेच महेंद्र पाटील,किशोर पगारे,निलेश राजपूत व रोहिणी वळवी उपस्थित होते…