
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे.
त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे पत्र खोट असल्याचं सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या बहुमताच्या चाचणीसाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्यावर राज्यपाल आता निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. सरकारला लवकरच आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यासंदर्भात बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या सरकार अल्पमतात चालू आहे म्हणून आम्ही राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे.” असं ते म्हणाले.
दरम्यान राज्याच्या सत्तासंघर्षाच तब्बल ९ दिवसांनी भाजपने एंट्री केली असून राज्यपालाची भेट घेत भाजपने मविआ सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. दरम्यान बंड केलेल्या आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने १२ जुलै पर्यंत लांबवली आहे. त्यानंतर राज्यपालांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.
फडणवीसाच्या पत्रानंतर शिंदे गटाची तातडीने बैठक
फडणवीसांच्या या पत्रानंतर शिंदे गटाने तातडीने गुवाहटीमध्ये एक बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्यानंतर आता शिंदे गटाच्या गोटातून काय निर्णय येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.