
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया आणि भारतातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ मध्ये मोठा बदल झाला आहे.
मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिलाआहे. त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांना कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
बाजार नियामक सेबी (SEBI) ला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की बोर्डाची बैठक 27 जून 2022 रोजी झाली. यामध्ये रिलायन्स जिओच्या बोर्डाने आकाश अंबानी यांच्या बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्तीला मान्यता दिली. रिलायन्सच्या AGM च्या आधी ही घोषणा करण्यात आली आहे.
पंकज मोहन पवार यांना पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही. चौधरी यांना पाच वर्षांसाठी संचालक करण्यात आले आहे.
त्यांची नियुक्ती 27 जून 2022 पासून प्रभावी मानली जाईल. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी 27 जून 2022 रोजी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. रिलायन्स जिओचे नवे चेअरमन आकाश अंबानी याआधी कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते.
जिओने अलिकडच्या वर्षांत डिजिटल क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे अधिग्रहन केले आहे. यामध्ये आकाश अंबानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच वेळी, नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. यामध्ये एआय-एमएल आणि ब्लॉकचेनचा समावेश आहे. जिओच्या 4 जी टेक्नॉलॉजीशी संबंधीत डिजिटल इकोसिस्टम तयार करण्यातही त्यांची महत्वाची भूमिका होती.