
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी -बाळासाहेब सुतार
गिरवी तालुका माळशिरस येथील नम्रता गणेश मोरे (सुतार) हि विद्यार्थिनी मांडवे येथील रत्नत्रय विद्यालयाची विद्यार्थिनी आसून वर्ष 2021- 22 दहावी एस एससी बोर्ड परीक्षेत 90% टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला तर, प्रथम क्रमांक रेणुका शत्रु गुण मोहिते 91% 40 टक्के इतके गुण मिळाले,, तर दुतिय क्रमांक प्रतीक्षा रामचंद्र शेंडगे या विद्यार्थिनीला 91%टक्के गुण मिळाले. विद्यार्थ्यांवर होणारे चांगल्या प्रकारे संस्कार आणि शिक्षण व विद्यार्थ्यांचा अभ्यास क्रमाची परंपरा कायमची टिकुन राहिल्यामुळे या विद्यालयाचे नाव जिल्हा आणि जिल्हा बाहेरील भागामध्ये प्रसिद्ध आहे.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष,, व प्राचार्य वाघमोडे सर, तोरणे सर, रुपनवर सर, सागर बागल सर, शेख मॅडम, सविता देसाई, या सर्वांनी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. मांडवे येथील रत्नत्रय विद्यालयाच्य शिक्षकांनचे व विद्यार्थ्यांचे देखील पालकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.