
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला “टाइम्स हायर एज्युकेशन आशिया ऍवॉर्ड 2022’चे “द डेटा पॉइंट रिसर्च इम्प्रुवमेंट ऍवॉर्ड’ जाहीर झाले आहे. संशोधन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आशिया खंडातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांचे मूल्यमापन करत दरवर्षी “टाइम्स हायर एज्युकेशन’ यांची क्रमवारी जाहीर करते. त्याअंतर्गत आशियातील विद्यापीठांच्या संशोधनाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. यात पाचशे विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधून अंतिम गटात आठ शैक्षणिक संस्थांची संशोधनातील कामगिरी उत्तम होती. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोत्तम ठरले आहे.
विद्यापीठाचे संशोधन हे उत्पादकता वाढविण्यासोबत संदर्भसुची म्हणूनही याचा वापरले जात असल्याचे निरीक्षणही यात नोंदवले आहे. २०११ ते २०२० दरम्यान संशोधन दुप्पट झाले असून याचा संदर्भ म्हणून व माहितीसाठी नागरिकांना उपयोग झाला आहे.