
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कंधार तालुका युवक अध्यक्षपदी व्यंकटी रामा तेलंगे यांची निवड करण्यात आली.यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रल्हादराव वडगावकर व मा. श्री शंकररावजी नांदेडकर साहेब राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष यांनी व्यंकटी रामा तेलंगे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या कंधार तालुका युवक अध्यक्षपदी निवड केली .
संघटना बळकट करण्यासाठी व मजबुतीसाठी संघटनेचे मुख्य ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून सर्व सामान्यांपर्यंत संघटनेचे काम पोहचविण्यासाठी हि निवड करण्यात आलेली आहे.
व्यंकटी रामा तेलंगे यांची तालुका युवक अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांना विविध संघटनंतर्फे सत्कार करण्यात आला.शिंदे शिवहार पाटील शुसिल घोडजकर पंकज ढवळे सर,आनंद तेलंगे व ईतर गावातील मंडळी यांनी शुभेच्या दिल्या त्या सर्वांचे मि सर्वांचे आभार मानतो