
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- भूम तालुका पत्रकार संघाच्यावतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यातून विधवा महिलांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांच्याच हस्ते या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार शंकर खामकर यांनी केले आहे.
दिनांक 30 जून 2022 रोजी दुपारी १२ – ३० वाजता प्रतिवर्षाप्रमाणे भूम तालुका पत्रकार संघाच्यावतीने इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
सत्कार सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून यशस्विनी अभियानच्या राज्य समन्वयक सौ वैशालीताई राहुल मोटे. उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ .अनुष्काताई आदित्य पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय या कार्यक्रमासाठी सौ राधाताई संतोष सुपेकर . सौ लताताई रूपेश शेंडगे. सौ सुवर्णा राजू साठे . विधिज्ञ अमृता गाढवे. सौ शुभांगी हेमंत देशमुख . सौ संध्या अशोक मस्कर . सौ मीराताई आबासाहेब मस्कर . सौ विक्रांती विलास शाळू. सौ मनीषा रमेश मस्कर . सौ अनुजा सचिन बारगजे. सौ मनीषा विनोद नाईकवाडी. यांच्या बरोबरच श्रीमती मीनाताई विनायक ऊपरे. श्रीमती सिंधुताई महादेव बागडे. श्रीमती अनिता अर्जुन काळे यांचेसह असंख्य महिलांची उपस्थिती राहणार आहे.
विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये जो विधवा महिलांना मानसन्मान मिळवून देण्याची संकल्पना राबवली जात आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमात देखील मानसन्मान दिला जाणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व पालक . शाळेचे मुख्याध्यापक . विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.