दै चालू वार्ता ,खंडाळी प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी:- शासन निर्णय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या परिपत्रकानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयातील वर्ग दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करणे बाबत परिपत्रक ई-मेल द्वारे महाविद्यालयास मिळाल्यामुळे त्यानुसार आज पासून महाविद्यालय ऑफलाइन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा गणेशदादा हाके पाटील यांच्या हस्ते नूतन विद्यार्थ्यांचा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना तब्बल दीड वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेले तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थी येत आहेत याचा मला खूप आनंद आहे.
विद्यार्थी हे बहुतांश अठरा वर्षाच्या वरील बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे तसेच राज्यातील covid-19 बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाय योजना करुन विद्यार्थ्याकरिता ऑफलाइन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे तसेच covid-19 च्या व्यवस्था बाबतचे निर्देश व राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्यावतीने निर्गमित केलेल्या सूचनाचे पालन करून विद्यार्थ्यांच्या सर्व वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत covid-19 चे सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांची संपूर्ण व्यवस्था महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे असे गणेश हाके यांनी सांगितले.
यावेळी संचालक कुलदीप हाके, प्राचार्य डॉ. नितीन शिवपुजे उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, आयटीआयचे प्राचार्य मदन आरदवाड, संतोष लातुरे, कालिदास पिटाळे, सुहास दहीटनकर, शेख तोहिद, समीर कुरेशी, निळकंठ नंदागवळे, संग्राम कोपनर, श्रुती मेनकुदळे, आरती पुणे, रूपा पाटील, सिद्धू मासुळे, सतिष केंद्रे,पांचाळ विजय आदी उपस्थित होते.