
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर: धर्माबाद तालुक्यातील जारीकोट ते सायखेड रस्त्यालगत शिवारातील पडीत शेतात अवैधरित्या तिर्रट नावाचा पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून सात आरोपींना ताब्यात घेतले तर १२ आरोपी फरार झाले. आरोपींकडून जुगाराचे साहित्य, दोन दुचाकी व रोख ३० हजार शंभर रुपये असा एकूण ८५ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) रात्री सातच्या दरम्यान घडली.या प्रकरणी पोलिसांनी नंदकुमार नारायण कामीनवार, धनंजय आनंदराव रामोड, गोविंद गंगाधर गंठोड, शिवकुमार गंगाधर गंठोड, व्यंकट लक्ष्मण भोजराज ( सर्वजण रा. जारीकोट), साईनाथ बाजीराव कदम (रा. चोळाखा), प्रमोद दत्ताहरी कदम (रा.चोंडी), तर फरार आरोपी नागेश विठ्ठल सुरेवाड, गणेश लिंगोजी मुपडे, मनोज सायलू रामोड, शिवाजी विठ्ठल मोकळे, माधव गंगाधर भोजराज, शेख फरीद, रमेश रामा कमलाकर, नरसिंग गंगाधर नरवाडे, मारोती दिगंबर उरेकर, साईनाथ लक्ष्मण उप्पोड, विलास साहेबराव कन्नेवाड (सर्वजण रा. जारीकोट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे हे सर्वजण जारीकोट ते सायखेड शिवारातील बालाजी पोशट्टी इसलवार यांच्या शेतालगत पडीत शेतात अवैधरित्या पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर एका खासगी पिकअप वाहनाने जाऊन पोलिसांनी छापा टाकून सात आरोपींना ताब्यात घेतले. तर १२ आरोपी फरार झाले. सदरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.