
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोपच्या उपसरपंच पदी सौ. वैशाली उमेश धुमाळ यांची उपसरपंच पदी नियुक्ती होताच त्यांनी आपला करंजखोप ग्रामस्थसह माता बहिणी करंजखोप ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी व सेवक वर्ग ग्रामसेवक तलाठी यांच्या उपस्थिंतीत सौ.वैशाली धुमाळ यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सौ. वैशाली धुमाळ या शेतकरी कुटुंबातील असून करंजखोपच्या मागील पंचवार्षिकच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिची निवड झाल्यापासून करंजखोप गावांमधील विकास कामांबाबत तसेच गावांतील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असायची एवढेच नव्हे तर सौ. वैशाली धुमाळ गावांतील गोरगरिब जनेतेसाठी सुख दुःखांच्या प्रसंगीही त्या नेहमी धावून येत असत. गेले महिन्याभरांपासून धुमाळ कुटुंबासह करंजखोप गावातील नागरिकांना सौ.वैशाली धुमाळ आता उपसरपंच होणार अशी चाहूल लागली होती. मात्र माननीय. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशावरुन करंजखोप उपसरपंच पदी सौ.वैशाली उमेश धुमाळ यांच्या नावांचा शिक्का मार्फत झाला. सौ. वैशाली धुमाळ यांची उपसरपंच निवड झाल्याबद्दल राजकीय सामाजिक, शैक्षणिक धार्मिक विविध क्षेत्रांतून तसेच कोरेगांव तालुक्यांसह पंचक्रोंशीतील ग्रामस्थ मंडळी तसेच करंजखोप ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी व कर्मचारी वर्ग, यांच्यासह गावांतील ज्येष्ठ नागरिक, माता बहिणी यांनी सौ. वैशाली धुमाळ यांची सदिंच्छ भेट घेत व कोरेगांव तालुक्यांतील मान्यवरांकडूंन सोशल मीडियावरुन त्यांचे अभिनंदन व त्यांना आपल्या पुढील सेवेसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला.