
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
लातूर थेरगांव जिल्ह्यांतील शिरुर आनंतपाळ तालुक्यांतील थेरगांव गावंचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना पंजाब पठाणकोट येथील सीमेवर कर्तव्य बजावत असताना झालेल्या चकमकीत त्यांना सोमवारी सायंकाळच्या सुमारांस वीरमरण आल्याची माहिती लष्करी विभागाकडूंन त्यांच्या नातेवाईकांना देण्यांत आली. त्यामुळे शिरुर आनंतपाळ तालुक्यांत संपूर्ण लातूर जिल्ह्यांमध्ये शोककळा पसरली. जवान सूर्यकांत तेलंगे यांचा विवाह सन २०१४ मध्ये झाला असून त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले भाऊ असा त्यांचा परिवार होता. ते शेतकरी कुटुंबातील होते त्यांना लहानपणापासून सैन्य दलात जाण्याची इच्छा होती त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावांत पूर्ण केले आणि रापका येथे पुढील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असल्यांने त्यांनी पुढील शिक्षण घेणे टाळले व सेवा करण्यासांठी सैन्य भरतीत जाण्यांची तयारी सुरु केली त्यांनी महाड येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले आणि २००७ मध्ये ते सैन्य दलात भरती झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी गावांत दाखल होताच भारत माता की जय अमर रहे ,अमर रहे सूर्यकांत अमर रहे अशा घोषणा दिल्या यावेळी पंचकोंशीतील ग्रामस्थ तसेच थेरगांव गावचे ग्रामस्थ सरपंच, ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांनी सोशल मीडियावरुन जवान सूर्यकांत तेलंगे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आनंतपाळ तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी लातूर जिल्ह्यांतील अधिकारीची उपस्थिंतीत जवान सूर्यकांत तेलंगे यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या पार्थिंवास तेलंगे कुटुंबीयांनी भडाग्नी देत आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली