
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,हरीत क्रांती प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात येत आहे, तालुक्यातील विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिर आयोजित करुन कार्यक्रम घेण्यात येत आहेत.आज आडोशी येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की परंपरागत शेती बरोबर आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे, शासनाने विविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा, तसेच गट शेती कडे लक्ष दिले पाहिजे, शिवाय फळबाग लागवड,मोगरा,स्टोबेरी,हळद लागवड करुन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी तालुआ कृषी अधिकारी श्री पारधी यांनी विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली,
यावेळी श्री प्रदीप वाघ पंचायत समिती सदस्य, श्री सुनील पारधी तालुका कृषी अधिकारी, श्री नंदकुमार वाघ चेअरमन, श्री सुरेश तमखाने मंडळ कृषी अधिकारी, श्री विकास बोरसे पर्यवेक्षक, श्री जे.आर.बालशी कृषी सहाय्यक, श्री रामदास थाळेकर, श्री भगवान पाटील, श्री अंनता पाटील, श्री प्रकाश गांगुर्डे, श्री मंगेश ठोमरे, श्री बाळु घाटाळ श्रीमती अनुसया पाटील, श्री सदाशिव ठोमरे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.