
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:- अनंता टोपले
पालघर : मोखाडा तालुक्यीताल भेंडीचापाडा इथे एका दहावीतील मुलाचा महावितरणच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या कुटुंबियांनी महावितरणने भरपाई दिली नव्हती. मॅक्स महाराष्ट्रने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पीडित कुटंबाला अखेर ४ लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे. प्रकरण काय? घरची परिस्थिती हालाखीची……पती मानसिकदृष्ट्या सक्षम नाही, पोरगं शिकून आम्हाला चांगलं दिवस आणि, या आशेने आई काबाड कष्ट करून मामाच्या गावाला राहून मुलाला शिक्षण देत होती. दहावी पास झालेला मुलगा लवकरच कॉलेजला जाईल ही आईची आशा….परंतु या रंगवलेल्या स्वप्नांवर एक दिवस अचानक काळाने घाला घातला. भावेश हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात वडाच्या झाडावर मुलांसोबत खेळायला गेला, परंतु तिथे सुरू असलेल्या वीजेच्या मेन लाईनचा शॉक लागून तो झाडावरून खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली व उपचारा दरम्यान नाशिकमध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
मोखाडा तालुक्यातील भेंडीचापाडा या आदिवासी पाड्यातील दहावीत शिकणारा भावेश कृष्णा भुरकूट वय (17) याचा वर्षभरापुर्वी मोखाडा इथून खोडाळ्याकडे जाणाऱ्या नवीन मेनलाईनचा शॉक लागून मृत्यू झाला होता. ही घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे घडली असताना याकडे कुणीही लक्ष दिले नाही. इथे ना लोकप्रतिनिधी फिरकले ना प्रशासन… परंतु या घटनेचे भयाण वास्तव मॅक्समहाराष्ट्राने मांडल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले. सतच्या पाठपुराव्यामुळे मृत भावेशच्या कुटूंबियांना 4 लाखांचा मदत मिळाली पीडित काटुंबानी ह्या घटनेचा ज्या ज्या पत्रकारांनी पाठपुरावा केला त्या सगळ्यांचे आभार मानले.