
दैनिक चालु वार्ता पेनुर प्रतिनिधी -राम कराळे .
लोहा तालुक्यातील मौजे. दगडगांव या गावात कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत कृषि संजीवनी सप्ताह मद्ये प्रगतिशील शेतकरी संवाद दिवस निमित्य किसान गोष्टी चे आयोजन तालुका कृषि अधिकारी श्री. अरूण घुमनवाड यांच्या मार्गदशनाखाली आयोजित करण्यात आला.
प्रगतिशील शेतकरी संवाद दिवस दिनानिमित्त खरीप हंगाम सन २०२२ अंतर्गत दगडगांव.ता.लोहा.
येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये बिज प्रक्रीया, बि.बि.एफ.वर पेरणी,टोकन पद्धतीने पेरणी, खत बच मोहिम, सेंद्रिय शेती, पोकरा नानाजी देशमुख ,स्मार्ट प्रकल्प, कृषि विभागाच्या विविध योजने विषयी माहिती देण्यात आली. व प्रगतिशील शेतकरी यांचा सत्कार करण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी लोहा श्री. अरूण घुमनवाड, मंडळ कृषि अधिकारी संदानद पोटपेलवार, कृ.प.हांडे साहेब,कृ.स.अजने,आत्मा चे तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री सोहेल या सर्वांनी कृषि संजिवनी सप्ताह विषयी मार्गदर्शन केले. गोविंद प्रभु शेतकरी कंपनीचे व्यवस्थापक डिगांबर लोंढे, प्रगतिशील शेतकरी रिसोर्स फार्मर मारोती मोते,रत्नाकर ढगे रा.सायाळ,एकनाथ भोसले रा.बोरगांव को यांनी विविध पिका विषयी सविस्तर माहिती दिली.गंगाधर मोते यांच्या शेतावर प्रगतिशील शेतकरी संवाद दिवस किसान गोष्टी आयोजन करण्यात आले. साई शिवेंद्र या शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मारोती गंगाधर मोते,उप सरपंच, बापुराव ढवळे, शंकर नवरे, विठठल मोते, पांडुरंग मोते,बापुराव मुदगुले, राजेश उराडे, व जवळा, बोरगांव ,सायाळ,अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.