
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील गिर्यारोहक अनिल वसावे याची निवड झाली आहे.या निवडी बद्दल खा.डॉ हिना गावित यांनी अनिल वसावेचा सत्कार केला.
एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल वसावे ची माऊंट एव्हरेस्ट वर चढाई करण्यासाठी निवड झाली.दिनांक 07 एप्रिल 2023 ते 07 जुन 2023 या कालावधीत अनिल वसावे ही मोहीम फतेह करणार आहे.त्यामुळे खा.डॉ.हिना गावित यांनी अनिल वसावे चा सत्कार केला.अक्कलकुवा सारख्या अतिदुर्गम भागातील बालाघाट या छोट्याशा गावातुन पुढे येत अनिल वसावे या युवकाने अनेक आंतरराष्ट्रीय मोहीमा फतेह केल्या आहेत.अशी आंतरराष्ट्रीय कामगिरी करणारा अनिल वसावे हा पहिला आदिवासीं युवक असुन त्याने समाजाचे आणि देशाचे नाव उंचावले आहे असे गौरवोद्गार डॉ.हिना गावित यांनी सत्कार प्रसंगी काढले.तसेच एव्हरेस्ट मोहीमे साठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.