
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
पेठवडज:-पेठवडज-कंधार नांदेड जिल्ह्याला जोडणारा रस्ता असून त्यावरील पेठवडज पासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावरील पुल अतिवृष्टीमुळे वाहून गेला त्याची दुरुस्ती केली नाही. काम मंजुरी देऊन तात्काळ दुरुस्ती करावी व प्रवासी यांच्या जिवितास धोका होणार नाही याची चौकशी करण्याची मागणी जाधव व्यंकटी व माधव वडजे यांनी मा.कार्यकारी अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना केली आहे