
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
आमदार प्रशांत बंब यांनीं मंजूर केलेल्या वॉटरग्रीड व हर घर नल से जल यां योजना मंजूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून बंब यांचे कौतुक…..
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन पंचक्रोशीतील मौजे सावंगी , अनंतपुर,हर्सूल, लासूर स्टेशन येथील शेतकरी व मालमत्ता खातेदार व रहिवासी नागरिक यानी आपले क्षेत्र कलम 42-क नुसार (NA)अकृषिक करून घेण्यासाठी व तसेच सोबत ई/पीक पाहणी, पिकपेरा,ऍप बाबत माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले कीं सध्या पेरणीच्या दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतात रस्ता लागतो त्यामुळे शिवरस्ते व शेतरस्ते तात्काळ मोकळे करावे वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्यावा व शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या अडचणी सोडवाव्यात असे सांगून आमदार प्रशांत बंब यांनीं मंजूर केलेल्या वॉटरग्रीड व हर घर नल से जल यां योजना मंजूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनीं आ.बंब यांचे कौतुक केले.
दरम्यान यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत,पिठाच्या गिरण्या,मोबाईल,बियाणे वाटप,करण्यात आले यावेळी लासूर स्टेशन येथील स्वामी समर्थ विद्यालयातील पितृछत्र हरपलेली वेदिका महाजन या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत सर्वांच्च गुण मिळवल्याने जिल्हाधिकारी महोद्ययांच्या शुभहस्ते मोबाईल देऊन सत्कार करण्यात आला व जिल्हाधिकारी यानी वेदिका हिची खास चौकशी करून मार्गदर्शन केले यावेळी धामोरीचे उपसरपंच रवी पाटील चव्हाण व भाजपचे उपजिल्हाद्यक्ष अमोल जाधव यानी लासूर स्टेशन,डोणगाव यां रस्त्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व ठेकेदारावर कारवाई करावे अशी मागणी केली..
यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे,जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे,किशोर झाडे,तहसीलदार सतिश सोनी,लासूर स्टेशनचे उपसरपंच संपत छाजेड, नारायण ठोळे,अमोल सिरसाठ,नितीन कांजूने,सोपान बोरकर, कल्याण पवार, रवींद्र चव्हाण,अमोल जाधव,भरत पाटणी,आदिन्साह तलाठी, ग्रामसेवक,महसूलचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होते