
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- भरत पवार
महाराष्ट्र हा तसा सुसंस्कृत राजकारणाचा प्रांत पण हालली या प्रांतात असं वादळ उठलय आणि या वादळाने दिल्ली तर हदरलीच पण थेट चीनच्या सिमेलगत असणार्या गोहाटी पर्यंत जाऊन हे वादळ पोहचलय . निश्चितच महाराष्ट्र राज्यातील जनतेला मान खाली घालण्यासाठी भाग पाडणारा हा सगळा नाट्यमय घटनाक्रम आहे.राजकारण हे तत्वाचा, निष्ठेच , आणि लोकहिताच असतं . त्या मध्ये स्वार्थ महत्वकांक्षा याचा लवलेशही नसतो . परंतु हल्ली अशी माणसं राजकारणात दुर्मिळ झाली आहेत . आणि संधी ,साधु, हुजरेगिरी , चमचेगिरी,चमकेगिरी करणारांच राजकिय पर्व साध्य जोरात सुरू असलेलं आपल्या पाह्यला मिळत आहे .
आपण ज्याला आदर्श मानतो . मार्गदर्शक संबोधतो समाजाचे दिशादर्शक म्हणून ज्यांच्या कडे पाहिलं जातं त्यांचं सार्वजनिक आचरण कस असलं पाहिजे .एक मत कमी पडलं ते मत विकत किंवा आमिष देवून मिळणं शक्य असतानाही तसं न करता थेट पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन एक आदर्श स्थापित करणारे अट्टल बिहारी वाजपेयी आणि स्वतःच पुर्ण बहुमत असतानाही विरोधी पक्षातील सदस्यांनाही आपल्या मंत्रिमंडळात मनाचा अभाळा एवढा मोठेपणा दाखवून स्थान देणारे पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आणि आणि पंतप्रधान पदाची संधी मिळुन सुद्धा नकार देणारे जयप्रकाश नारायण कुठं , काय ती राजकिय सुजनशिलता होती लोक प्रतिनिधी हा राजा असतो . सामान्य लोकांसाठी तो कधी कधी देव पण असतो . आणि राजा देव हा कसा असला न्यायवादी , धर्मनिष्ठ, कर्तव्य परायन , लोकहितवादी, तो लोकांसाठी आदर्श असा मार्गदर्शक, दिनदर्शक असतो .परंतु सध्याच राजकारण जर पाहिलं तर दिशा कुठं आणि दशा कुठं यांचा थांगपत्ता लगताना दिसत नाही . लोकांच्या विषयावर प्रश्नावर बोलताना कुणी दिसत नाही सगळी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेमुळे चालू आहे . आणि सगळं पाहून सर्वसामान्य लोकांच्या मनात काय प्रश्न निर्माण होत असतील काय उपमा द्यायची हा सुद्धा प्रश्न पडतोच म्हणजे जसं माकड या झाडावरून त्या झाडावर जावी तसे इकडुन तिकडे पळणारे राजकीय हि सध्याच्या राजकारणाची ओळख .
आपल्याकडं ग्रामीण भागात एक लोक म्हण प्रचलित आहे जशी वरमाई असती तसंच लग्नाचं वरहाड असतं . म्हणून लग्नात वरमाई हि खुप महत्वपूर्ण असती .तसंच राजकारणात लोक प्रतिनिधी सुद्धा खुप महत्वपूर्ण असतात .
लोक प्रतिनिधी ज्यांना आपण लोकशाही मधील राजा अस संबोधतो . परंतु राजा कसा असावा त्याच बोलन वागन आचरण हे न्याय निति धर्माला अनुसरून असतं नैतिकता हा राजाच्या राज्यकारभाराचा आधारस्तंभ असतो . आणि राजकारणात सध्या जे घडत आहे ते पाहिलं तर सर्वसामान्य माणसाच्या मनात किळस निर्माण होईल अशीच अवस्था निर्माण झाली आहे याचं या सगळ्या घडामोडीला राजकिय तमाशा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.वैचारीक मत भेद असु शकतात आणि मतभेद व्यक्त करण्यासाठी लोकशाही व्यवस्था आहे . उंदीर शेतातुन पळावेत इकडुन तिकडे अशा पद्धतीने लोक प्रतिनिधी पळु लागले .तर सर्वसामान्य लोकांनी नेमका आदर्श काय घायचा व ज्या पद्धतीने भाषाशैली टिका टिप्पणी राजकारणात वापरली जाऊ लागली ते ऐकायला पण किळस येत आहे . आदर्श निर्माण करणारे च जर दिशा हिन झाले तर आदर्श कोणाचा घाययचा राजा जर निति भ्रष्ट झाला तर मग अनुकरण करणारी प्रजा काय करणार . राजकारण हे लोकांच्या विकासासाठी असतं हि कल्पना आता ईतिहास जमा झाली आहे . संपत्ती कमवणे आणि स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करणयाचा कायदेशिर मार्गच झाला आहे .
अँड सुचिता गिते(दहिफळे)
विधिज्ञ जिल्हा न्यायालय नांदेड मो नं 8605514266