
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
पणजी :- टपाल खात्याकडून गोव्यात शनिवार, 02 जुलै 2022 रोजी मोबाईल क्रमांक-आधार जोडणी आणि पाच वर्षांखालील बालकांची आधार नोंदणी यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
अल्तो-पर्वरी टपाल मुख्य कार्यालय, बेतकी टपाल शाखा, म्हार्दोळ टपाल शाखा, म्हापसा टपाल कार्यालय, कळंगूट टपाल कार्यालय या उत्तर गोवा जिल्ह्यातील आणि वास्को टपाल कार्यालय, कुंकळ्ळी टपाल कार्यालय, सांकवाळ टपाल शाखा, कोला टपाल शाखा या दक्षिण गोवा जिल्ह्यातील टपाल कार्यालयांमध्ये 02 जुलै 2022 रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. पाच वर्षांखालील बालकांची आधार नोंदणी निःशुल्क आहे