
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
अतनूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाबूराव ऊर्फ साधूसावकार पत्तेवार यांचे सुपुत्र गव्हाण ता.जळकोट येथील रहिवासी व उदगीर येथे किराणा दुकानाचे व्यापारी, मितृभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे सचिन बाबूराव पत्तेवार वय ३४ वर्षे यांचे आज (दि.२८ ) सोमवार रोजी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवार दि.२९ रोजी दुपारी गव्हाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या प्रश्चात पत्नी, एक मुलगा, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. अतनूर सोसायटीचे माजी चेअरमन व्यंकटराव पत्तेवार सावकार यांचे पुतणे होते.